पर्यावरण आणि शाश्वत विकास
ग्रामपंचायतीने सार्वजनिक रस्त्याच्या दुतर्फा,सार्वजनिक ठिकाणी सन २०२१-२२ मध्ये १५०० झाडे व सन २०२२-२३ मध्ये २००० झाडांची लागवड केली आहे.लागवड केलेल्या प्रत्येक झाडाचे संरक्षण करण्याचा संकल्प ग्रा.पं.ने घेतलेला आहे.लागवड केलेल्या प्रत्येक झाडांना संरक्षण जाळी बसविलेली असल्याने ग्रा.पं.ने लागवड केलेली झाडे १००% जिवंत आहेत. अवैद्ध वृक्षतोडीमुळे जंगलाचा ऱ्हास होत चाललेला असताना ग्रा.पं.ने पर्यावरण रक्षण व संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे ओळखून ग्रा.पं.ने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनावर अधिक भर दिलेला आहे. सामूहिकरीत्या जंगलाचे संरक्षण करण्याची जबाबदारी बारीपाडा व खडकीपाडा येथील ग्रामस्थांनी उचलेली आहे. सामुहिक वनव्यवस्थापन समितीमार्फत जंगल संरक्षणाचे काम चालू आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला उपजिविकेचे साधन निर्माण व्हावे या हेतूने ग्रा.पं.मार्फत गेल्या तीन वर्षापासून ५% पेसा व वित्त आयोगाच्या निधीमधून उत्तम दर्जाची आंबा,काजू,पेरू,जांभूळ,चिकू फळझाडांचे कलमे वाटप केली जातात. प्रत्येक शेतकऱ्याने ग्रा.पं.ने दिलेली फळझाडाची रोपे लागवड करून ती जागवण्याचा संकल्प केलेला आहे.वाटप करण्यात आलेली १००% झाडे शेतकऱ्यांनी जगवली आहेत.





