ग्रामपंचायत आंबेसरी

गावाची  एकूण कुटुंबसंख्या १२३३ असून त्यापैकी दारिद्य्ररेषेखाली कुटुंब संख्या ८९७ आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ९९% लोकसंख्या आदिवासी समाजाची असून विखुरलेल्या स्वरुपात वस्ती आहे.गावातील आदिवासी समाजात मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता मुलगा व मुलगी यांचेकडे  समानतेनेबघितले जाते. गावात स्त्रीभ्रूण हत्तेचे प्रमाण 0% आहे.त्याचेच उदाहरण म्हणून गावातील एकूण महिलांचे प्रमाण सरासरी ५२%आहे.गावातील बहुतांश आदिवासी-वारली समाजाची लोकवस्ती असून काहीप्रमाणात आदिवासी-कातकरी समाजची लोकवस्ती आहे.गावात पारंपारिक पद्धतीने धवलेरींच्या मार्फत लग्न विधी पार पाडले जातात तर लग्नामध्ये हुंडा देणे ही प्रथा नाही.दरवर्षी गावात गावदेव,रवाल,दिवाळी व जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.सणउत्सवामध्येपारंपारिक वाद्य जसेतारपा,तूर,रोही,सांबळ यासारखे वाद्य वाजवून नृत्य केले जाते.सर्व नृत्य सामुहिकरित्या केले जात असल्याने गावात नृत्यांमधून सामुहीकतेचे दर्शन घडते.

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कुटुंबाचा भातशेती मुख्य व्यवसाय आहे.भात पिकाबरोबरच तूर,उडीद,चवळी,ज्वारीची पिके घेतली जातात. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन,भाजीपाला लागवड,आंबा,काजू,चिकू लागवडीमधून बागायती पिक घेण्याकडे शेतकर्यांचा कल वाढलेला आहे. ग्रामपंचायत पासून उंबरगाव (गुजरात) या ठिकाणी मुबलक उद्योग, कारखाने असल्याने गावातील तरूण-तरुणी उंबरगाव येथील कंपनीत नोकरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे.

राजकीय स्थिती

ग्रामपंचायत अंतर्गत ५ वार्ड संख्या असून मतदार संख्या -४३२० आहे. ग्रामपंचायत सदस्य संख्या १४ आहे. त्यामध्ये अनु-जमाती महिला -७ व अनु.जमाती पुरुष- ७ आहेत.त्यापैकी श्रीम. गिता शैलेश मोरघा ह्या  जनतेमधून थेट सरपंच पदी निवडून आले आहेत.गावात माक्सर्वादी कमुनिष्ट पक्ष,शिवसेना,भाजप,मनसे हे पक्ष कार्यरत आहेत. परंतु गाव विकासासाठी राजकीय पक्षपात न करता सर्वजन एकजुटीने काम करतात. त्यामुळे गावाची विकासाकडे यशस्वीपणे वाटचाल चालू आहे. गावात उत्तम दर्जाची व चांगली कामे करण्यास सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे व ग्रामस्थांचे उत्तम सहकार्य लाभते.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रएकूणपुरुषमहिला
एकूण घरे
 
एकूण लोकसंख्या
5690
2955
2714
०–६ वर्षे वयोगटातील मुले
अनुसूचित जाती (SC)
अनुसूचित जमाती (ST)
   
साक्षरता (%)
   

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)   
उपकेंद्र (Sub Center)   
अंगणवाडीहोय  होय 
प्राथमिक शाळाहोय   होय 
माध्यमिक शाळाहोय  होय 
उच्च माध्यमिक शाळा   
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र   
समुदाय भवन (Community Hall)   
१०स्वस्त दर दुकान (PDS)   
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय  होय 
१२इंटरनेट / मोबाईल टॉवर   
१३सीएससी केंद्र (CSC Center)   

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: 

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव:

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता : ग्रामपंचायत आंबेसरी 
ता. – डहाणू , जि. – पालघर ( ४२१३०३ )